परभणी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार दि ३० जानेवारी रोजी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्सस्तरीय आराखडा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार विक्रम काळे, आ . बाबाजानी दुर्राणी, आ. सुरेश वरडपुडकर, आ .डॉ.राहुल पाटील, आ .मेघना बोर्डीकर-साकोरे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले की, मागच्या वर्षी सर्व राज्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यामध्ये यावर्षी पाचशे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ व मानव विकास निर्देशांक यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा नियतव्यय ठरविण्यात आला आहे. व त्यानुसारच प्रत्येक जिल्ह्याची वित्तीय मर्यादा ठरविण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडींचे बांधकाम याबाबत मनरेगा अंतर्गत जो ‍निधी प्राप्त होतो त्यामधुन उर्वरित कामे करावीत. तसेच पोलिसांच्या वाहन दुरूस्तीसाठी १कोटी रुपयांचा निधी द्यावा. नाविन्यपूर्ण योजनेतील निधी शंभर टक्के खर्च करावा. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत वाढीव निधीसाठी नगर विकास खात्याकडे मागणी करावी.

जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)सन २०२०- २१ या वर्षासाठी शासनाकडून १५६ .८२ कोटी रकमेची वित्तीय मर्यादा कळविण्यात आली होती. त्यानुसार यंत्रणांकडून आलेल्या मागणीचा विचार करुन शासनाकडे १४१ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी वित्तमंत्री यांच्याकडे करण्यात आली. वित्तमंत्री अजीत पवार यांनी त्यामध्ये ४४ .२८ कोटी रुपयांची वाढ करुन २०२०- २१ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी २००कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेस मान्यता दिली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ सिनेमाचा पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’

कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी

Leave a Comment