सातारा | सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्हीही विद्यार्थींनी या नववीत शिकणाऱ्या होत्या. त्यातील एका विद्यार्थ्यींने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामधील मजूकराने आता पालकांनी सावध होणे गरजेचे असून मुलांच्यावर अपेक्षाचे अोझे ठेवू नये असाच मजकूर चिठ्ठीत होता.
सातारा शहरातील उपनगरातील धुमाळ आळी येथील एका नववीत शिकणाऱ्या अनुष्का पवार या मुलींन गळफास घेवून आत्महत्या केली. तर दुसरीकडे कराड येथील मलकापूरमध्ये पायल लोंढे या नववीत शिकणाऱ्या मुलींन गळफास घेवून आत्महत्या केली. यामध्ये अनुष्का पवार या मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या चिठ्ठीमध्ये तिने म्हटलं आहे.
जिल्ह्यातील या दोन आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच शाळासह पालकांच्यात भीतीचे वातावरण आहे. अभ्यासावरील ताण आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे अनुष्काने जीवन संपवल्याची चर्चा आहे.