पंतप्रधानांनाच मिळेना जन्मदाखला; नेमका काय आहे ‘हा’ प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्या जन्माचा दाखला आपल्याजवळ असावा असे वाटत असते. तो मिळवण्यासाठी अनेकवेळा हेलपाटेही घालावे लागतात. असाच अनुभव ‘राष्ट्रपती’ आणि त्यानंतर आता ‘पंतप्रधानांच्या’ बाबतीत आला आहे. पंतप्रधानांचा जन्म दाखला दिला जात नसल्याने त्यांच्या पालकांवर दाखला मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान हे नाव संविधानिक असल्याचे कारण सांगत हा जन्म दाखला लाल फितीच्या कारभारात अडकून राहिला आहे. हा प्रकार एका दाम्पत्याच्या बाबतीत घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात चिंचोली भुसणी या ठिकाणी एका दाम्पत्य राहते. त्या दाम्पत्यांना दोन मुले झाली असून त्यांनी पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती आणि दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान असे ठेवले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या चिंचोलीचे दत्ता आणि कविता चौधरी या दाम्पत्याने 19 जून 2020 या दिवशी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखला त्यांना मिळाला त्याचे या दाम्पत्याने आधार कार्डही बनवले.

काही महिन्यापूर्वी या दाम्पत्याला बोरामणी जिल्हा सोलापूर येथे 10 नोव्हेंबर 2019 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरे बाळ झाले. त्यांनी या बाळाचे नाव पंतप्रधान असे ठेवले. बाळाचा नामकरण विधी पार पडल्यानंतर बाळाचे वडील दत्ता चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात पंतप्रधान नावाचा जन्म दाखला मिळावा यासाठी 27 नोव्हेंबरला अर्ज सादर केला. मात्र, त्याच्या नावाचा दाखला काही मिळाला नाही.

बाळाच्या नावावरून अधिकारीही चक्रावले

दत्ता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव पंतप्रधान असे ठेवल्याने व त्याच्या जन्माचा दाखला मिळावा अशी मागणी केल्यास समजताच अधिकारीही चक्रावून गेले. पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे याबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी आरोग्य केंद्र सोलापूरच्या जिल्हा निबंधक जिल्हा मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक डिसेंबरला पत्र पाठवले आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून दत्ता चौधरी याने केलेल्या जन्म दाखल्याच्या अर्जाला आता एक महिना उलटून गेला तरी काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुलाच्या पालकांकडून जन्म दाखल मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये हेलपाटे घातले जात आहेत.

Leave a Comment