हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकल रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच जण शर्यतीत धावत असतात. अनेक घरात आई वडील दोघेही नोकरी करणारे असतात. या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वत:साठीही वेळ देणं कठीण झाले आहे. त्यातच लहान मुले असतील आणि आई-वडील दोघेही नोकरीला जाणारे असतील तर मुलांसाठी वेळ काढणं मुश्किल होतंय.नोकरी आणि घर अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेक पालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक वेळा मुलांकडे लक्ष ठेवायला घरातले असे कोणी नसते. त्यामुळे मुलांना मग पाळणाघर किंवा छोट्या शाळेत टाकले जाते. कि ज्याणेंकरून त्यांच्या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवण्यास कोणीतरी असू शकेल. परंतु या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता. अनेक वेळा आपल्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी बद्धल केला तर मुलांसाठी नक्की वेळ देऊ शकतो. पालकांनी अश्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, याबदल माहिती घेऊया….
मोबाईलपासून दूर राहा—
घरी असताना पालकांनी मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गोष्टी बाजूला सारून तो वेळ आपल्या मुलांसह व्यतीत करा. त्यामुळे मुलं दिवसभरातील त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतील.
शॉपिंगसाठी शक्यतो बाहेर पडू नका—
जर तुम्ही घरी असाल तर शॉपिंगसाठी शक्यतो घराबाहेर पडू नका. अतिशय गरज असेल तिथेच बाहेर पडा. शॉपिंगच्या वेळेत तुमच्या लहान मुलांसोबत खेळा. त्यांच्याशी गप्पा मारा.
सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी मुलांशी बोला—
सतत बोलल्याने मुलांना बरे वाटते आणि ते आपल्याला अनेक गोष्टी शेअर करू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’