सौदी राजकुमारीच्या घरात झाली मोठी चोरी; कोट्यवधींचे दागिने गेल्याच्या धसक्याने रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पॅरिस । सौदीच्या राजकुमारीच्या पॅरिसमधील घरात चोरी झाल्याची अजब घटना समोर आली आहे. राजकुमारी घरात नसताना चोरटयांनी मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला आहे. यात लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. घरात चोरी झाल्याचा धसका घेतल्यानं सौदीच्या राजकुमारीला थेट रुग्णालयात भरती करावं लागलं आहे. या हाय प्रोफाईल चोरीनंतर पोलीस कामाला लागले आहेत.

गेल्या ऑगस्टपासून सौदीची 47 वर्षीय राजकुमारी घराकडे फिरकलेली नाही. तिच्या घरामध्ये लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. या साऱ्या मौल्यवान वस्तूंची किंमत €600,000 युरो होती. राजकुमारी जेव्हा घरी आली तेव्हा घरफोडी झाल्याचे समजले. आत जाऊन घरातील मौल्यवान वस्चूंची पाहणी केली, तर ते गायब असल्याचे आढळले. ही चोरी हाय प्रोफाईल असल्याने पोलीसांनी प्रत्येक चोरट्याची धरपकड करण्यास सुरुवात केली.

या चोरीचा धसका राजकुमारीने घेतला असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या धक्क्यातून ती न सावरल्याने तिने अद्याप पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. या प्रकरणी बटाक्लानच्या बँक्सी आर्टवर्क येथून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या राजधानीमधील पॉश एरियात असलेल्या जॉर्ज अव्हेन्यूमधील अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता.

सौदीच्या राजकुमारीकडे दोन हर्मीस बॅग होत्या. या बॅगची किंमत 10 हजार ते 30 हजार युरो होती. याशिवाय़ मौल्यवान घड्याळे आणि दागदागिने होते. तसेच फरची प्रावरणे देखील होती. राजकुमारीच्या इमारतीमध्ये ऑगस्टपासून एक व्यक्ती राहण्यास आला होता. त्यानेच ही चोरी केल्याचे ली पॅरिसिअन वृत्तपत्राने म्हटले आहे. तर राजकुमारीच्या घराच्या स्पेअर किल्ल्यादेखील हरवल्या आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in