कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बोकड दीड वर्षाचा असून या बोकडाचे वजन तब्बल 65 किलोच्या आसपास आहे. या बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत असल्याने मोठी चर्चा सुरू आहे.
या बोकडाच्या डोक्यावर जन्मताच अर्धचंद्रकोरची खून असल्यामुळे मुस्लिम समाजात बकरी ईदला अशा बोकडाच्या कुरबानीला फार महत्व आहे. मुंबई, पुणेसह अनेक ठिकाणाहून मुस्लिम बांधवांकडून आतापर्यंत या सोन्या नावाच्या बोकडाला 18 लाख 50 हजारापर्यंत मागणी केली आहे.
बोकडाच्या डोक्यावर जन्मताच अर्धचंद्रकोर असल्यामुळे हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. बोकडाला 23 लाखाची बोली लागल्याने लोक कुतुहालाने बोकड पाहण्यास येत आहेत. सध्या या बोकडाचीच भागात मोठी चर्चा सुरू आहे.