पाटणच्या धारेश्वर मठाला मिळाले 14 वर्षाचे नवे शिवाचार्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | महाराष्ट्रासह अनेक राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धारेश्वर मठाला नवे शिवाचार्य जाहीर करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धारेश्वर मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून आदीराज शिवाचार्य यांचे नाव जाहीर करण्यात आले. पाटण तालुक्यातील धारेश्वर मठ येथे हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा मंगळवारी (दि. 31 जानेवारी) पार पडला.

आदीराज शिवाचार्य हे 14 वर्षाचे असून 18 व्या वर्षी सर्व धार्मिक विधीत सहभागी होणार आहेत. या उत्तराधिकारी सोहळ्यास अनेक महाराज, साधू, संत, महंत व शिवाचार्य उपस्थित होते. हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. धारेश्र्वर मठ येथे श्रीराम, पांडव यांचा अधिवास असल्याचे ऐतिहासिक दाखले दिले जातात.

धारेश्वर मठ निसर्गाच्या सानिध्यात आहे. याठिकाणी बारमाही डोंगरातून पाणी वाहत असते. अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात येथे होत असतात. लिंगायत समाजातील वर्ग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतो.