सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याची दिसते. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा हजाराच्या घरात गेला आहे. शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 977 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 511 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी माहिती दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 1 हजार 428 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 91 हजार 439 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 77 हजार 705 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 321 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 18 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 753 जणांचे नमुने घेण्यात आले.
दरम्यान, सातारचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी आता कडक पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यात मध्यन्तरीच्या काळात कॉरोन बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील र्निबंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे पहायला मिळत आहे.