हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शार्जीलने जे भाषण केले त्याला आमचा पाठिंबा नाही. तो आमच्या लोकांविरुद्धही बोलतो. परंतु, देशद्रोहाच्या कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, असे मत जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैया कुमारने व्यक्त केले.आज अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.शार्जील जर राष्ट्रविरोधी असेल तर ते सिद्ध करा. माझ्यावरही देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला होता, असे कन्हैया कुमार म्हणाला.
कन्हैया कुमारने सांगितले की, उद्यापासून ‘संविधान वाचवा – नागरिकत्व वाचवा’ यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा मोतीहारी बापूधाम येथून सुरू होणार आहे. तर २९ फेब्रुवारी रोजी पाटणाच्या गांधी मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे. या दिवशी गांधी मैदानात CAA, NRC आणि NPR विरोधात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांना ‘फक्त रोजगार पाहिजे’, अशी घोषणा यावेळी करण्यात येणार आहे.