मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयंत पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई केली. एकदा दिलजमाई करुनही दोन्ही राजांमध्ये कुरबुर सुरुच होती. मात्र आज दोघांना एकत्र घेऊन शरद पवारांनी वाद मिटवला, असा दावा दोन्ही राजांनी केला.
साताऱ्यातील लोकसभेची जागा उदयनराजे यांना द्यायला जिल्ह्यातील आमदारांचा विरोध होता. त्यामुळे शरद पवार यांनी ही बैठक घेऊन पक्षातील अंतर्गत वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकदिलाने निवडणूक लढण्यास तयार झाले आहेत.
इतर महत्वाचे –
एमपीएससी चा निकाल जाहिर ; सुमित खोत राज्यात प्रथम
‘हा’ आहे नारायण राणेंचा दुसरा उमेदवार
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांच्यात ‘ही’ चर्चा झाली…