Video पवार – गांधी यांची सत्ता आली तरीही जाब विचारणारच : किरण माने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

उद्या शरद पवार- राहूल गांधी यांची सत्ता आली तरी मी जाब विचारणार कारण सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे. मी फेसबुकवरून राजकीय भूमिका घेतो, यामुळे माझं काम थांबविण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली. माझ्यासाठी हे धक्कादायक असले तरी मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार असे अभिनेता किरण माने यांनी सांगितले.

स्टार प्रवाह मराठी चॅनेलवरती मुलगी झाली हो या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आलेले विलास पाटील अर्थातच किरण माने यांनी केलेल्या राजकीय पोस्टवर त्यांना मालिकेतून काढण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, काल ‘मुलगी झाली हो’ शूट सुरू असताना मला हिंदी प्रॉडक्शन्स हाउस मधून फोन आला की तुमच्यावर काहीजण नाराज असल्यामुळे तुम्हाला रिप्लेस केले जात आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464021802020360

अभिनेता किरण माने म्हणाले, राजकारणावर बोलू नको, राजकारणावर लिहू नको हे बोलणे योग्य नाही, असे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत. बहुजन लोकांचे नाहीतर सामान्य लोकांचे यापुढील काळात जगणे अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर यापुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येणारं आहे. कुणी माझ्या पाठीशी उभे राहू अगर ना राहू मी एकटाच लढणार आहे.

सरकार कोणाचंही असो, विरोधात पोस्ट करणं माझा हक्क

मला याधीही ट्रोल केले जात आहे. अश्लील अर्वाच्च भाषा वापरली जात आहे त्यांना वाटत आहे की मी खचलो आहे. हि विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. यापुढील काळात मला बदनाम केलं जाणार आहे. खोटे आरोप करून बदनाम करणे हे त्यांचे मोठे शस्त्र आहे. मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात तर मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूने मी पोष्ट लीहली आहे. ही राज्य सरकारच्या विरोधात पोस्ट आहे. कोणताही सरकार असलं तरी त्यांच्या विरोधात पोस्ट करणार तो माझा हक्क असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.