तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे? अशाप्रकारे शोधा

नवी दिल्ली । आधार कार्ड हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. बँक खात्याद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आयकराशी संबंधित कामासाठीही आधार कार्ड जरुरीचे आहे. मोबाईल वॉलेटच्या वापरातही आधार कार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि पॅनकार्डसोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसल्यास कोणतेही महत्त्वाचे काम करताना त्रास होऊ शकतो.

एका व्यक्तीकडे एक आधार असू शकते, मात्र एखाद्या व्यक्तीचे अनेक मोबाइल नंबर आणि अनेक बँक खाती असतात. त्यामुळेच अनेक वेळा आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी किंवा मोबाइल क्रमांकाशी जोडले गेले आहे हे लक्षात राहत नाही. ज्यामुळे नंतर गोंधळाची स्थिती निर्माण होते.

तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे शोधण्यासाठी बँक किंवा आधार कार्ड केंद्रात जाण्याची गरज नाही. तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्यातून लिंक केले आहे हे तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन शोधू शकाल.

अशा प्रकारे जाणून घ्या-
सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://www.uidai.gov.in वर जा.
येथे Check Your Aadhaar and Bank Account या लिंकवर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.
आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
UIDAI वेबसाइटवर हा OTP टाका.
येथे तुमच्या समोर login चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर, तुमच्या आधारशी लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांचा तपशील उघड होईल.

आधार कार्ड लॉक करता येते
UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, तुम्हाला तुमचे आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा देखील देते. आधार कार्ड लॉक करण्याचा फायदा म्हणजे तुमचे आधार कार्ड कुठेतरी हरवले तर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारे आधारशी लिंक केलेला तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

आधार कार्ड लॉक करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP संदेश पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला ‘LOCKUID आधार क्रमांक’ टाइप करून हा OTP पुन्हा 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

You might also like