हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : सरकारकडून आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर आपण अजूनही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर आता यासाठी दुप्पट दंड द्यावा लागणार आहे. हे लक्षात घ्या कि, सरकार कडून यासाठीची शेवटची मुदत अनेकदा वाढवण्यात आली आहे. 30 जून 2022 पर्यंत पॅन-आधार लिंकिंगसाठीचा दंड 500 रुपये होता, मात्र 1 जुलैपासून तो 1000 रुपये करण्यात आला आहे.
अशा प्रकारे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा (PAN-Aadhaar Link)
>> यासाठी सर्वांत आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/portal वर जा. खाली दिलेल्या Link Aadhaar वर क्लिक करा.
>> आपले स्टेटस पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा. येथे आधार आणि पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील.
>> जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल तर पॅन आधार क्रमांकाशी लिंक केलेला दिसेल.
>> जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा.
>> त्यानंतर डिटेल्स भरा. अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल. PAN-Aadhaar Link
अशा प्रकारे भरावा लागेल दंड
पायरी 1: पॅन-आधार लिंकिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean या पोर्टलला भेट द्या.
पायरी 2: पॅन-आधार लिंकिंग विनंतीसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
पायरी 3: Tax Applicable निवडा.
पायरी 4: कृपया मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांच्या व्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत एकच चलनामध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
पायरी 5: नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
पायरी 6: पॅन क्रमांक एंटर करा, मूल्यांकन वर्ष निवडा आणि पत्ता एंटर करा.
पायरी 7: कॅप्चा एंटर करा आणि Proceed टॅबवर क्लिक करा. PAN-Aadhaar Link
हे पण वाचा :
Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या
Stock Market : येत्या 2-3 आठवड्यात दुप्पट कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवा पैसे !!!
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू
Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या
PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???