एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स

Credit Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card चा वापर खूपच वाढला आहे. बँका देखील यावर अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देत आहेत. ज्यामुळे याद्वारे भरपूर खरेदी केली जाते. मात्र अनेकदा असे घडते की, आपल्याकडे पैशांची अडचण असते. अशावेळी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसेच शिल्लक नसतात. अशा परिस्थितीत जर आपल्याकडे दोन क्रेडिट कार्ड असतील तर एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिटने भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

Credit Card Balance Transfer – Omozing

सध्याच्या काळात अनेक बँकांकडून निवडक क्रेडिट कार्ड्सवर बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा अर्थ असा कि, एका कार्डवरून दुसऱ्या कार्डावर खर्च केलेला बॅलन्स ट्रान्सफर करण्याची परवानगी देणे. बॅलन्स ट्रान्सफरसाठीचे पैसे एका Credit Card मधून घेतले जातात आणि दुसर्‍या कार्डवर पाठवले जातात. मात्र यासाठी दुसऱ्या कार्डचे क्रेडिट लिमिट हे खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. इथे हे जाणून घ्या कि, आपण ज्या बँकेच्या कार्डवरून बॅलन्स ट्रान्सफरसाठी पैसे घेता, त्या बँकेकडून जीएसटी आणि प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. या सुविधेमध्ये क्रेडिट कार्ड ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पुन्हा बफर कालावधी मिळतो ज्यादरम्यान त्यांना कोणतेही व्याज द्यावे लागत नाही.

Planning to withdraw cash on your credit card? Watch out for the expenses |  Business Standard News

कॅश अ‍ॅडव्हान्स

जर आपल्याकडे बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय उपलब्ध नसेल तर Credit Card बिल कॅशने भरू शकता. यासाठी कॅश अ‍ॅडव्हान्सचा पर्याय वापरता येईल. अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी कॅश अ‍ॅडव्हान्स उपयोगी पडू शकतो. मात्र त्यासाठी काही शुल्क द्यावे लागेल. कॅश अ‍ॅडव्हान्सद्वारे क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येतील.

e wallet app on smartphone with credit card in shopping cart wallet  technology pay - Mobile payment online shopping concept Stock Photo | Adobe  Stock

ई-वॉलेटद्वारे क्रेडिट कार्डचे पेमेंट

हे लक्षात घ्या कि, आपल्या Credit Card चे बिल ई-वॉलेटद्वारेही भरता येईल. यासाठी क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे टाका आणि नंतर ते बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करा. त्यानंतर क्रेडिट कार्डचे बिल भरा. यासाठीही ई-वॉलेटनुसार शुल्क द्यावे लागेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbicard.com/en/personal/benefits/lower-interest-option/balance-transfer.page

हे पण वाचा :
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश
Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न