नवी दिल्ली । Paytm कडून आणखी एक वाईट बातमी आली आहे. त्याची मूळ कंपनी One 97 Communications ने म्हटले आहे की,” सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत तिचा एकत्रित तोटा वाढून 474 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा तोटा 437 कोटी रुपये होता. मात्र, कंपनीच्या उत्पन्नात (महसूल) 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
दुसरीकडे, ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनलने Paytm च्या टार्गेट प्राईसमध्ये कपात केली आहे. जेएम फायनान्शियलने Paytm स्टॉकचे नवीन टार्गेट 1,783 रुपयांवरून 1,240 रुपये केले आहे. लिस्टिंग झाल्यापासून Paytm चा शेअर 17.16 टक्क्यांनी घसरला आहे.
दुसऱ्या तिमाहीत कमाई 64 टक्क्यांनी वाढली
दुसर्या तिमाहीत कंपनीचे कामकाजाचे उत्पन्न वार्षिक आधारावर 64 टक्क्यांनी वाढून 1,090 कोटी रुपये झाले आहे. नॉन-UPI पेमेंट व्हॉल्यूम (GMV) 52 टक्के वाढ आणि फायनान्शिअल सर्व्हिस बिझनेसमध्ये 3 टक्क्यांहून झालेली वाढ यामुळे कंपनीच्या कमाईत महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे.
दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे कॉन्ट्रिब्शन प्रॉफिट 260 कोटी रुपये होते. त्यात वार्षिक आधारावर 6 पट वाढ झाली आहे. वेगवेगळ्या सेगमेंट
वर नजर टाकल्यास, कंपनीच्या पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिस सेगमेंटने 842.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कालावधीत, वार्षिक आधारावर 69 टक्के वाढ झाली आहे, जी मागील वर्षी याच तिमाहीत 497.8 कोटी रुपये होती.
क्लाउड आणि कॉर्पस सर्व्हिसेसचे उत्पन्न देखील वाढले
दुस-या तिमाहीत, कंपनीचा क्लाऊंड आणि कॉर्मस सर्व्हिसेसचा महसूल वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून 166 कोटी रुपयांवरून 243.8 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 626 कोटी रुपयांच्या तुलनेत 825.7 कोटी रुपये होता, जो वार्षिक तुलनेत 32 टक्क्यांनी वाढला आहे.
स्टॉक एक्स्चेंजवरील निराशाजनक लिस्टिंगनंतर One 97 Communications चे शेअर्स सलग 2 दिवस घसरले. त्यानंतर सलग 3 दिवस त्यात वाढ झाली. कालच्या ट्रेडिंगमध्ये, शेअर NSE वर 16.15 रुपयांनी (0.90 टक्के) घसरून 1,782.60 रुपयांवर बंद झाला.