शेंगदाणा तेलाच्या किंमती वाढणार? गृहिणींचे बजट कोलमडण्याची शक्यता

Peanut oil rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही काळात शेंगदाणा तेलाच्या (Peanut Oil) किमती वाढण्याची शक्यता असून सर्वसामान्य माणूस आणि गृहिणींसाठी हा मोठा झटका आहे. रोजच्या वापरातील शेंगदाणा हा खरं तर अतिआवश्यक खाद्यपदार्थ आहे. पण यंदा शेंगदाणा लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने शेंगदाणा दर गगनाला भिडले आहेत. त्याचाच परिणाम होऊन येत्या काही दिवसात शेंगदाणा तेलाच्या किमती वाढू शकतात.

खरं तर घरगुती पदार्थानासाठी सातत्याने वापरात येणाऱ्या शेंगदाण्याचा मोठं महत्त्व आहे आणि त्याची मागणीही मोठी आहे. मात्र राज्यातील शेंगदाणा उत्पादनात घट झाली आहे. शेंगदाण्याची आवक कमी झाल्याने असच जर सुरु राहील तर येत्या काही दिवसात शेंगदाण्याचे दर गगनाला भिडतील. शेंगदाणा तेल बनवणाऱ्या कंपन्यांमधून शेंगदाण्याचा मोठी मागणी असते. परंतु आवक कमी झाल्याने तेथील शेंगदाण्याची कमतरता भासू लागली आहे. याशिवाय अलीकडच्या काळात शेंगदाणा तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेंगदाणा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या शेंगदाणा तेलाची सरासरी किंमत सुमारे 175 रुपये 1 लिटर आहे. मात्र यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्ही पिकवलेला शेतमाल विकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थ्याची आवश्यकता नाही. हॅलो कृषी या मोबाईल अँपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू शकता. याशिवाय जो सर्वसामान्य ग्राहक आहे ज्याला शेतमाल विकत घ्यायचा आहे तो सुद्धा हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी घरबसल्या विकत घेऊ शकतो. त्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा. हॅलो कृषी ओपन करताच त्यातील शेतमाल या पर्यायावर क्लीक करा. यामध्ये तुम्हाला तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य किमतीसह दिसेल. येव्हडच नव्हे तर त्याखाली सदर शेतकऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांकही दिसेल. त्यावर फोन करून तुम्ही शेत शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकता. त्यासाठी मोबाईल Hello Krushi डाउनलोड करा. याव्यतिरिक्त हॅलो कृषीमध्ये तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी यांसारख्या सुविधाही अगदी मोफत मध्ये मिळतील.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

महाराष्ट्रातील शेंगदाणा उत्पादनात घट झाल्यामुळे बाहेर राज्यांतून येणाऱ्या शेंगदाण्यांवर आपल्याला अवलंबून राहावे लागत आहे. आपल्या इथे खास करून गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून शेंगदाणा येतो. परंतु येथील शेंगदाणा हायब्रीड असतो. दक्षिणेतील राज्यांमधून महाराष्ट्रात शेंगदाणा येत नाही. कारण तेथील शेतकरी दक्षिणेकडील राज्यांमध्येच आपला माल विकणे पसंद करतात. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारात शेंगदाण्याची आवक कमी राहून दर असेच वाढत राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेंगदाणा तेलाच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे गृहिणींचे बजट कोलमडण्याची शक्यता आहे.