हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक शेअर बाजार विक्रीच्या सावटाखाली आहेत. सध्याच्या काळात अनेक विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारही (FPIs) भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. आतापर्यंत देशांतर्गत शेअर बाजाराची कामगिरी खराब राहिली आहे. मात्र, असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी या काळात गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Raj Rayon Industries Ltd चे शेअर्स देखील असेच आहेत. गेल्या दीड वर्षात या शेअर्सची गुंतवणूकदारांना 225 पट रिटर्न दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून घसरण
गेले काही दिवस या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आजही (27 मार्च रोजी) हे शेअर्स जवळपास दोन टक्क्यांनी घसरून 67.85 रुपयांवर बंद झाले. तसेच गेल्या पाच दिवसांत त्याची किंमत 7.62 टक्के तर गेल्या एका महिन्यात 15 टक्क्यांहून जास्तीचे घसरली आहे. मात्र, यानंतरही हे शेअर्स मल्टीबॅगर शेअर्सचा एक भाग बनले आहे. Penny Stock
अशा प्रकारे झाली वाढ
01 ऑक्टोबर 2021 रोजी फक्त 30 पैसे किंमत असलेले हे शेअर्स आता 67.85 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यानंतर गेल्या दीड वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 22,516 टक्के रिटर्न मिळवीन दिला आहे. Penny Stock
गेल्या महिनाभरात किंमत झाली कमी
जर आपण या वर्षाकडे नजर टाकल्यास ते 36.90 रुपयांवरून सुमारे 84 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सची किंमत 16.80 रुपयांवरून 67.85 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत या शेअर्सची किंमत सुमारे 300 टक्क्यांनी वाढली आहे. Penny Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने महिनाभरापूर्वी यामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 85 हजार रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, या वर्षाच्या सुरुवातीला एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.84 लाख रुपये झाले असते. जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 03 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती. त्याचप्रमाणे जर एखाद्याने ऑक्टोबर 2021 मध्ये या मध्ये 45 हजार रुपये गुंतवले असते तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. Penny Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/raj-rayon-industries-limited/rajrayon/530699/
हे पण वाचा :
आता घरबसल्या Digital Gold वर मिळेल कर्ज, त्यासाठीचे व्याजदर पहा
खुशखबर !!! Ujjawla Yojana अंतर्गत LPG सिलेंडरवरील अनुदानाची मुदत एका वर्षासाठी वाढवली
Bank Holiday : एप्रिलमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया