हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येकाला भविष्यात मोठा नफा कमावून देणाऱ्या पेनी स्टॉकविषयीची माहिती हवी असते. जर आपणही अशाच पेनी स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण अवघ्या 1 महिन्यात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या 4 पेनी स्टॉक बाबतची माहिती जाणून घेणार आहोत….
जगसनपाल फायनान्स अँड लीजिंग
सध्या या शेअर्सची किंमत 6.88 रुपये आहे. या शेअर्सची गेल्या 1 आठवड्यात 27%, गेल्या 1 महिन्यात 172%, गेल्या 3 महिन्यांत 42% तर गेल्या 3 वर्षात 188% रिटर्न दिला आहे. 1991 मध्ये स्थापना झालेली ही कंपनी फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहे. स्मॉल कॅप स्टॉक असलेल्या या कंपनीची मार्केट कॅप 395 कोटी रुपये आहे. तसेच या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 6.88 रुपये प्रति शेअर तर गेल्या 52 आठवड्यांचा नीचांक 2 रुपये प्रति शेअर आहे. Penny Stocks
महाराष्ट्र कॉर्पोरेशन
आज इंट्राडेमध्ये 4.59 टक्क्यांच्या वाढीसह हे शेअर्स 2.39 रुपयांच्या पातळीवर आहेत. महाराष्ट्र कॉर्पोरेशनच्या शेअर्सने गेल्या 1 आठवड्यात 38%, गेल्या 1 महिन्यात 111%, गेल्या 1 वर्षात 240% तसेच गेल्या 3 वर्षात 1241% रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 2.47 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा नीचांक 0.62 रुपये आहे. 1982 मध्ये स्थापना झालेली ही कंपनी फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहे. सध्या या कंपनीची मार्केट कॅप 143 कोटी रुपये आहे. Penny Stocks
पगारिया एनर्जी
सध्या हे शेअर्स 7.44 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. या शेअर्सने गेल्या 1-आठवड्यात 27%, गेल्या 1 महिन्यात 101%, गेल्या 3-महिन्यांमध्ये 116% रिटर्न तसेच गेल्या 3 वर्षांत 376 टक्के रिटर्न दिला आहे. 1991 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी व्यापार क्षेत्रात काम करते. त्याची मार्केटकॅप 3.24 कोटी रुपये आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 7.44 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 3.05 रुपये आहे. Penny Stocks
जानुस कॉर्पोरेशन
सध्या या शेअर्सची किंमत 6.81 रुपये आहे. 9.57 कोटी रुपये मार्केट कॅप असलेली ही कंपनी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या शेअर्सने फक्त गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत मल्टीबॅगर रिटर्ननंतर गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. तसेच या शेअर्सची गेल्या 3 महिन्यांत या शेअर्सने 112% रिटर्न दिला आहे. Penny Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/maharashtra-corporation-ltd/mahacorp/505523
हे पण वाचा :
PIB fact Check : 500 रुपयांची ‘ही’ नोट खरी आहे की बनावट, अशा प्रकारे समजून घ्या
सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी
Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
Kotak Mahindra Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा