Saturday, June 3, 2023

मोराचे अश्रू पिऊन मोरणी होतात गर्भवती? नेमकं खरं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोराला सौंदर्याचे दुसरे रूप म्हंटले गेले असून त्याला देशाचा ‘राष्ट्रीय पक्षी’चा दर्जा मिळाला आहे. या मोराच्या गर्भधारणेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. मोराच्या डोळ्यात पाणी आलं तर मोरनी गरोदर होते. मोर अंडी घालत नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की मोर आणि मोर यांचे शारीरिक संबंध होत नाहीत. तर मोराचे अश्रू पिऊन मोरणी गर्भवतीहोतात, जाणून घेऊया या मागील खरं सत्य आणि नेमकं कारण काय आहे ते…

मोर हा आयुष्यभर ब्रह्मचारी राहतो आणि त्याच्या अश्रूंमुळे मोरनी म्हणजे लांडोर गर्भवती होते. असा संभ्रम दूर करण्यासाठी काही लोकांनी न्यायालयात पुरावे सादर केले. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञानी आपली मते मांडली. इतर पक्ष्यांप्रमाणे मोर आणि मोरनी देखील क्लोकल किसचा अवलंब करतात आणि मोराच्या शुक्राणूंनी मोराची गर्भधारणा होते.

standard peacock

राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश महेशचंद्र शर्मा यांनी अलीकडेच मोर ब्रह्मचारी असल्याचा दावा केला होता. मोराचे अश्रू टिपल्यामुळेच लांडोर गर्भवती होते, असे म्हंटले होते. परंतु, मोराचे अश्रू आणि लांडोरीची गर्भधारणा ही एक दंतकथा असल्याचे पक्षितज्ज्ञांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनीसुद्धा ही दंतकथाच असल्याचे सांगत मोर-लांडोराच्या समागमातूनच लांडोर गर्भवती होते, असे स्पष्ट केले आहे.

Mor Pankh

मोराचे पिसापासून होतो वास्तू दोष दूर

मोर हा अत्यंत महत्वाचा पक्षी आहे. हिंदू धर्मात मोराच्या पिसाला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडायचे, म्हणून ते मोरपंख धारण करायचे. याशिवाय गणेश, कार्तिकेय, माता सरस्वती, इंद्रदेव इत्यादी इतर देवतांनाही मोराच्या पिसांचं विशेष आकर्षण आहे. मोराच्या पंखाला केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रीयही महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख घरात ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. मोराच्या पंखामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.