मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 अहमदनगर प्रतिनिधी । जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

सत्ताधारी पक्षाच्या नीतिमत्तेवर टीका करताना पवार म्हणाले की, ‘भाजपने नुसत्या योजना जाहीर केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच अरबी समुद्रातील स्मारकाचं नुसतंच भूमिपूजन केलं. मात्र काम काहीच झालं नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक बाधंण्याचं जाहीर केलं मात्र तेही काम सुरु केलं नाही. मग यांनी पाच वर्षात नेमकं काय केलं.’  अशा शब्दात पवारांनी भाजपावर ताशेरे ओढले.

गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडत आहेत. कधी मुख्यमंत्री पवारांना शोलेचा जेलर म्हणत आहे तर पवार यांनी मुख्यमंत्रांच्या पैलवानकीच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘कुस्ती पैलवानबरोबर खेळली जाते अशांसोबत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांची टर उडवली होती. त्यामुळे निवडणूक संपेपर्यंत पवार-फडणवीस वाक युद्ध आणखी पेटणार यात वाद नाही.