हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात बस दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिमला : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक बस दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये 12 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत.

सविस्तर माहिती अशी कि, बस शैनशेरहून कुल्लूला जात असताना जंगला गावाजवळील एका वळणावर सकाळी साडेआठला दरीत कोसळली(Accident). अपघातग्रस्तांच्या नातलगांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तीन तास लागले. ही कारवाई त्वरित झाली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते असे मृतांच्या कुटुंबियांचे म्हणणे होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या भीषण अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान

अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड

एकनाथ शिंदेनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

Leave a Comment