हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळ्याचा ऋतू असल्याने अनेकजण शनिवार आणि रविवार आला कि फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, राहण्याची खूप अडचण होते. खुप पैसे देऊन एखाद्या हॉटेलमध्ये रूम घ्यावी लागते. तुम्हीही थर्टी फस्ट साजरा करायला गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही राहण्याची काळजी करण्याचे कारण नाही. कारण गोव्यातील असे एक ठिकाण आहे कि त्या ठिकाणी तुम्ही फुकट राहू शकता. गोव्यातील ‘पापी चुलो’ नावाचे एक हॉस्टेल आहे. तिथे तुम्हाला काम करून अगदी मोफत एका व्हॉलंटियरप्रमाणे राहता येऊ शकते.
अथांग पसरलेला समुद्र, निळेशार पाणी, चमचमणाऱ्या वाळूचे किनारे आणि नारळाच्या बागा, गोव्यातील हे निसर्गसौंदर्य पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करत असते. ख्रिसमस आणि नवीन वर्षी गोव्यामध्ये सुट्ट्या व्यतीत करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या काळात पर्यटकांची अगदी झुंबड उडत असते. परंतु, गोव्याला जायचे म्हटलं की, बजेटचा विचार करावा लागतो. तिथं राहणं आणि फिरण्यासाठी बराच खर्च लागतो; पण गोव्यात मोफत राहता येऊ शकतं. यासाठी काही नियम पाळावे लागतील.
‘या’ ठिकाणी राहता येईल मोफत
गोव्यातील ‘पापी चुलो’ नावाचे एक हॉस्टेल आहे. तिथे तुम्हाला एका व्हॉलंटियरप्रमाणे राहता येऊ शकते. अशा प्रकारच्या हॉस्टेल्समध्ये काम करणाऱ्यांची संख्या फारच कमी असते. अशा वेळी तुम्ही तिथे राहून कामात सहकार्य करू शकता. तिथल्या माणसांना मदत करून तुमच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे काम केले तर तुमच्याकडून पैसेही घेतले जात नाहीत.
मोफत राहण्यासाठी काय करावे लागणार?
व्हॉलंटियर म्हणून तुम्हाला ‘पापी चुलो’मध्ये राहत असताना बार अटेंडिंग, रिसेप्शन, हेल्प डेस्क, हाउसकीपिंग आणि टूर गाइड अशा पद्धतीची कामे करावी लागतात. हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफची कमतरता असते. त्यामुळेया याठिकाणी काम करून वेगळा अनुभवही घेता येऊ शकतो. हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पर्यटक येतात. त्यांच्याशी चर्चा करून नवीन मित्र शोधण्याचा एक वेगळा अनुभवही तुम्हाला घेता येईल.
मोफत फिरण्याचा आनंद
गोवा फिरत असताना बजेट फार कमी असले तरी अनेक असे समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही मोफत निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. गोव्यातले समुद्रकिनारे खेळाच्या मैदानाप्रमाणे आहेत. उत्तर गोव्यात अरामबोल किनारा, तसंच दक्षिण गोव्यात काणकोण समुद्रकिनाऱ्यावर वाटेल तेवढा वेळ पाण्यात खेळू शकता, किनाऱ्यावर सूर्यप्रकाशात बसू शकता. याला सनबाथही म्हटले जाते. परदेशी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सनबाथचा आनंद घेतात.
‘या’ ठिकाणी पाहू शकता कासवांचे नैसर्गिक घर
गोव्यात गेल्यावर अशी अनेक ठिकाणे आहेत कि त्याची आपल्याला काहीच माहिती नसते. या याठिकाणी कासवांचे नैसर्गिक घरही आहे. उत्तर गोव्यात मोरजी आणि मंड्रेमचा किनारा आणि दक्षिण गोव्यामध्ये अगोंडा आणि गलगीबागा किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवे आढळतात. या कासवांचं नैसर्गिक घरही तुम्हाला पाहता येईल. निसर्गाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशी जोडले जाऊन काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.
दिवसा काम रात्रीच्या वेळी करू शकता शॉपिंग
दिवसा हॉस्टेलमध्ये काम केल्यानंतर तुम्ही रात्र झाल्यानंतर गोव्याचे सौंदर्य पाहू शकता. येथील अरपोरामध्ये सॅटर्डे नाइट मार्केट आणि बागामध्ये मॅकीज नाइट मार्केट अतिशय उत्तम आहेत. तेथे शॉपिंग करण्याचा आनंद काही वेगळाच ठरू शकतो. याशिवाय गोव्यामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात गोवा कार्निव्हल आयोजित करण्यात येतो. यात गोव्याची संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडतं. तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध कलांचा आनंद घेता येतो. महोत्सवात डान्सर म्युझिशियन आणि कलाकारांना वेगवेगळ्या वेशभूषेत पाहण्याचा अनुभव अगदी मोफत तुम्ही घेऊ शकता.