कोरोनातून बरे झालेले लोक होत आहेत ‘या’ गंभीर आजाराचे शिकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बाब रिसर्च मधून समोर येत आहे. कोविड -१९चा हा नवीन व्हेरिएन्ट समोर येत आहे जो अधिक धोकादायक मानला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत कोविड -१९ च्या धोक्याच्या यादीत मधुमेहाने म्हणजेच डायबिटीज ने पीडित असलेले लोक सर्वात वर आहेत.

जे लोक कोविडमधून कव्हर झाले आहेत त्यांच्यात डायबिटीसची लक्षणे दिसू लागली आहेत. किंग कॉलेज लंडनचे एमडी प्राध्यापक फ्रान्सिस्को रुबिना यांनी डायबीटीस आणि कोरोना यांच्यातील संबंधांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक कोविडच्या मेजर लक्षणांचे शिकार झाले आहेत त्यांना डायबिटीस आढळत आहे. दरम्यान डायबेटिसच्या रुग्णांची आकडेवारी वाढण्याचा समोर आले आहे. नुकताच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे की लोकांमध्ये कोविड संक्रमण झाल्यानंतर डायबेटिस ची लक्षणे दिसली आहे.

कोविड सोबत डायबेटिसच्या कनेक्शन बाबत बराच वैज्ञानिक डेटा समोर आला आहे. ज्यात वेगवेगळे विचार आहेत आकडेवारीनुसार जे लोक टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह हा चे शिकार आहेत त्यांना कोविडची गंभीर लक्षणे दिसत आहेत. हेल्थ एक्सपोर्ट नुसार टाइप 2 डायबिटीस एक मोठा फॅक्टर असू शकतो.

वैज्ञानिकांनी चीनच्या हूबेई प्रांतात करोनाच्या ७३३७ रुग्णांवर एक अभ्यास केला त्यातील 952 रुग्ण आधीपासून टाइप 2 डायबेटिसने ग्रस्त होते. रिसर्च मधून समोर आला कि टाईप 2 डायबेटिस असलेल्या कोरोना रुग्णांना जास्त मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते आणि त्यांच्यातून मृत्यू दरही जास्त असतो.

तज्ञांच्या मतानुसार डायबिटीसने पीडित लोकांना सर्वाधिक धोका covid-19 चा आहे. ग्लुकोजच्या लेवलमध्ये चढ-उतार झाल्यावर हा धोका अधिक वाढतो जर ग्लुकोजचे प्रमाण वाढलं तर आपली इम्युनिटी कमजोर होते त्यामुळे आपण लवकर आजारी पडतो आणि संक्रमणापासून लढण्याची क्षमता ही गमावतो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ग्लुकोजच्या स्तर कमी झाल्याने डायबिटीस असलेल्या कोबड संक्रमित रुग्णांना अधिक धोका असतो त्यामुळे ग्लुकोज नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.

सायन्टिफिक अमेरिकन रिपोर्टनुसार covid-19 असे अनेक रुग्ण व त्यांच्यात डायबेटिसची लक्षणे नव्हती त्यांच्यात अचानक डायबेटिसची लक्षणे दिसू लागली आहेत. हे लक्षात घेता इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडन आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटीने एक coviddiab रजिस्ट्री तयार केली आहे ज्यात डॉक्टरांना अशा रुग्णांची माहिती द्यायची होती ज्यांना कोविंड नंतर डायबेटिसची लक्षणे आहेत.

Leave a Comment