हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक जणांना हृदयाचा त्रास होतो. आजकाल कमी वयातही लोकांना सुद्धा हृदयाच्या समस्या निर्माण होतात. भारतात सर्वात जास्त लोक हे हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडतात. हा आकडा इतर आजारांपेक्षा जास्त आहे. सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. अनेक लोकांच्या खाण्यापिण्याच्या समस्या बदलल्या पाहिजेत. व्यायामाची सवय नसणे ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. हृदयविकाराचा प्रकार म्हणजे हा छातीत दुखणे आहे. श्वास घेण्याचा त्रास निर्माण होणे .
भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचा आकडा सर्वांधिक आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढतेय. हा हृदयविकार होण्याची अनेक कारणं जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण अतिताणतणाव, धुम्रपान, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढत वयं आणि लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृदयविकार होतात. याशिवाय, बऱ्याचदा अनुवांशिकता हे सुद्धा एक कारण आहे. परंतु, हृदयविकार आपणं नियंत्रणात ठेवू शकतो. त्यासाठी दररोज केमिकल युक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा आणि दररोज काही प्रमाणात का होईना व्यायाम करणे गरजेचे आहे.
जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की, हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. अशावेळी अचानक हृदय बंद पडते. याला हृदयविकारचा झटका आला असं म्हटलं जाते. त्यासाठी त्वरित इलाज करणे गरजेचे आहे.
हृदयविकाराचे प्रमुख प्रकार —
कोरोनरी आर्टरी डिसीज —
कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, छाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात.
हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी – —
हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास न लागणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात.
जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. जसे की, हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष, भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात. असे अनेक प्रकार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’