गरज असल्यासच सिटी स्कॅन चाचणी करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची  कोविड लक्षणे, रक्त चाचणी, ऑक्सिजन लेव्हल यावर रुग्णाची उपचाराची दिशा ठरते, अत्यंत गरज असल्यास  सिटी स्कॅन चाचणी करावी, अशी महत्वपूर्ण सूचना केंद्रीय पथकाने दिली. शनिवारी केंद्रीय पथकाने महानगर पालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटर येथे भेट दिली.

यावेळी पथकाने येथील कामाची पद्धत, रुग्ण संख्या किती आहे, त्यांच्यावर केले जाणारे उपचार पद्धती याबद्दल पाहणी केली. मागील एक वर्षापासून रुग्णालय प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. तसेच महानगर पालिकेच्या वतीने शहरातील 115 वार्ड मध्ये सुरू असलेल्या जम्बो लसीकरण मोहिमेची पथकाने प्रशंसा केली.

यावेळी केंद्रीय पथकात डॉ . दीपक भट्टाचार्य (फुफुस विकार तज्ज्ञ -सफदरगंज हॉस्पिटल नवी दिल्ली),  डॉ . अभिजित पाखरे (भोपाळ) यांच्यासमवेत मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मेलट्रॉन येथील आरोग्य अधिकारी वैशाली मुदखेडकर,  मनपाचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment