पराभवानंतर चेन्नईला अजून एक दणका; ‘या’ कारणांमुळे धोनीला भरावा लागला 12 लाखांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजून 1 धक्का बसला. या सामन्यातील स्लोव ओव्हर रेट मुळे आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन टाइम आउट देण्यात आलेत. म्हणजे ८५ मिनिटांमध्ये २० षटकांचा खेळ संपवणं अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येक तासाला ओव्हर रेट हा १४.१ असा असायला हवा. मात्र या नव्या नियमांचं चेन्नईच्या संघाकडून उल्लंघन झालं. सामन्यात चेन्नईच्या संघाने १८.४ षटकं टाकली आणि दिल्लीच्या संघाने ८ चेंडू राखत १८९ धावांचं लक्ष गाठलं.

दरम्यान धोनीची या मोसमातली ही पहिलीच चूक असल्यानं केवळ १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. पण दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंडाची रक्कम २४ लाख, तर तिसऱ्या वेळेस ३० लाखांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो आणि महत्वाची बाब म्हणजे एका सामन्याची बंदी देखील येऊ शकते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like