व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भोंगा वाद : साताऱ्यात मनसेच्या महाआरतीस पोलिसांची परवानगी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा मनसेने देखील प्रतिसाद देत मंगळवारी दि. 3 मे रोजी सायंकाळी महाआरतीचे आयोजन केले आहे. या महाआरतीला पोलिसांनी 14 अटी आणि शर्थी टाकून शाहूपुरी पोलिसांन परवानगी दिलेली आहे.

मुस्लिम समाजाने 3 तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीसमोर भोंगे लावून भोंग्याला भोंग्याने उत्तर देण्याचा इशारा सातारा मनसे जिल्हा प्रमुख युवराज पवार आणि शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. मंगळवारी 3 मे रोजी राजवाड्यावर गांधी मैदान येथे सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. याला शाहूपुरी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लघंन केल्यास कादेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अटीमध्ये म्हटले आहे की, महाआरतीस 3 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान वेळ दिली आहे. यावेळी पार्किंगची व्यवस्था करावी. दिलेल्या वेळेतच महाआरती करावी. स्वतंत्र सुरक्षा व स्वयंसेवक नेमावेत. कार्यक्रमांची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची राहील. डाॅल्बी सिस्टीमचा वापर करता येणार नाही तसेच आवाजावर मर्यादा राहील. काॅलेज, दवाखाने, शाळा, शासकीय कार्यालय यांची तक्रार आल्यास कारवाई होणार, स्पीकरवर कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नये, असे पोलिसांत सांगितले आहे.