औरंगाबाद – शहरात येत्या सोमवार पासून अर्थात 7 फेब्रुवारी पासून पाचवी पासूनचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने सदर आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र शहरातील केवळ 8वी पासूनचे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता ५वी ते ७वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता शहरातील पाचवी पासूनचे पुढील सर्व वर्ग प्रत्यक्षपणे सुरू होतील.
दरम्यान, सर्व शाळांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सर्व शिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे तसेच अन्य नियमांची पूर्तता व विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्याबाबत सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.