Friday, June 2, 2023

कराड शहरातील रस्त्यांच्या कामाची गटनेते सौरभ पाटील यांच्याकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून कराड शहरामध्ये विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. याच निधीमधून प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या कामांची आज लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पाहणी केली. तसेच कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

सध्या कराड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम केले जात आहे. आज गटनेते सौरव पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे अभियंता एम. एच. पाटील व संबंधित ठेकेदाराला दर्जात्मक काम करण्याच्या सूचनाही केल्या.

यावेळी पोपटराव साळुंखे, शिवाजी पवार, विक्रम भोपते, मंगेश वास्के, अजय सूर्यवंशी, महेश सुर्यवंशी, महेश चव्हाण , शशिकांत शिंदे, रुपेश चव्हाण, सतीश मुळीक, चंद्रहार नलवडे, बापू देसाई, आशितोष सुर्यवंशी, शेखर जाधव, सुनील घोरपडे संजय मुळीक, प्रदीप आवले, दादा पवार, अक्षय रैनाक, जयंत बेडेकर (दादा), सतीश भोंगाळे, भारत थोरवडे आदी उपस्थित होते.