सोनिया गांधींच्या 71 वर्षीय पीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Sonia Gandhi Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्या विरोधात एका महिलेने बलात्कार (Rape) आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. माधवन यांनी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून अद्याप मानधवन यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पतीच्या निधनानंतर झाली ओळख
पीडित महिलेचा पती काँग्रेसच्या कार्यक्रमात होर्डिंग्ज आणि पोस्टर लावण्याचे काम करायचा. तक्रादार महिला पतीसह काँग्रेसच्या कार्यक्रमांनाही जात होती. यादरम्यान महिला अनेकदा पक्ष कार्यालयातही गेली होती यामुळे अनेकांशी तिची ओळख झाली होती. 2020 मध्ये पतीच्या निधनानंतर तिची आर्थिक स्थिती बिकट झाली. मदतीच्या आशेने ती काँग्रेस कार्यालयात गेली तेव्हा तिथं कोणीतरी पीपी माधवन यांचा नंबर दिला.

घरी भेटायला बोलावून केला बलात्कार
यानंतर या पीडित महिलेने माधवन यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा माधवन यांनी या महिलेला सुंदर नगर येथील घरी नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले. तेथे महिलेची कागदपत्रे घेण्यासोबतच माधवनने तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. माझा घटस्फोट झाल्याचे सांगत माधवन यांनी या महिलेसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर पीडित महिला आणि पीपी माधवन यांच्यात व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलद्वारे बोलणे सुरु झाले. यानंतर माधवन यांनी एकदा रात्री अचानक भेटायला बोलावले. माधवनने तिला कारमध्ये बसवले आणि ड्रायव्हरला जाण्यास सांगितले.

यानंतर त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडित महिलेने विरोध केल्यामुळे पीपी माधवन रागाच्या भरात निघून गेला.यानंतर दुसऱ्या दिवशी पीपी माधवनने या महिलेला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्यानंतर पीडित महिला आणि पीपी माधवन हे पुन्हा एकदा पूर्वीसारखे बोलू लागले. यानंतर पुन्हा एकदा माधवनने घरी बोलावून बलात्कार (Rape) केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यावेळी या महिलेला पीपी माधवनचा घटस्फोट झाला नलसल्याचे समजले. माधवनने लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

हे पण वाचा : 

महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव; सामनातून गंभीर आरोप

कुर्लामध्ये 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश

गोव्याहून राजस्थानला दारू वाहतूक : महामार्गावर सापडल्या 36 हजार बाटल्या

T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड

आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!