पूजा चव्हाण प्रकरणातील 56 मिनिटांची सीडी बाहेर काढू; शिवसैनिकांचा संजय राठोड यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनीच पूजा चव्हाण हिची हत्या केली असून 56 मिनिटांची एक सीडी बाहेर काढू असा थेट इशारा यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.

संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. पूजा चव्हाणप्रकरणातील 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडून असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल, असा गौप्यस्फोट राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. तसेच हा माणूस बंजारा समाजाशी पण गद्दार आहे बेईमान आहे, हे आम्ही जनतेला दाखवून देऊ अस ते म्हणाले.

अजूनही वेळ गेलेली नाही. संजय राठोड यांनी आताही गुवाहाटी मधून मातोश्री वर यावं आणि माफी मागावी. नाहीतर, आत्तापर्यंत त्यांनी शिवसैनिकांचे प्रेम पाहिले आता त्याना रोष पहावा लागेल. अस राजेंद्र गायकवाड यांनी म्हंटल.

दरम्यान, गतवर्षी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना राजीनामा देऊन मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र पोलीस तपासात पूजाचा मृत्यू हा अपघात च असल्याचे सिद्ध झाले आणि संजय राठोड यांना दिलासा मिळाला.

Leave a Comment