Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशात नुकतीच गॅस दरवाढ झाल्यामुळे आता पेट्रोल व डिझेलच्या किमतीही वाढणार तर नाही ना? अशी शंका प्रत्येकाच्या मनात रोजच येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल -डिझेलचे दर स्थिर आहेत. आज पुन्हा नव्याने पेट्रोल -डिझेलचे दर जाहीर झाले असून तेलाच्या दरात आजही कोणता बदल करण्यात आलेला नाही. तर मग जाणून घेऊया आजचे नवे दर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर मुंबईत आज प्रति लिटर पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये लिटर आहे.

विशेष म्हणजे आज देशातील कोणत्याही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नसल्याने सर्वसामान्यांसाठी आज हि चांगली आनंदाची बातमी आहे. चेन्नईत पेट्रोल, डिझेल 102.63 रुपये आणि 94.24 रुपये आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये लिटर आहे.

कोणत्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत?

– मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रुपये 97.28 रुपये

– पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये लिटर लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर