हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरु असलेली लोकांची मागणी पूर्ण होणार आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमती 5 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. हि माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीनी त्यांच्या एक्स हँडलवरून दिलेली आहे. या निर्णयामुळे लोकांची चिंता कमी झाली असून, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही असे सांगितल्यामुळे दिवाळीनिमित्त लोकांसाठी चांगले गिफ्ट मिळणार आहे.
6 राज्यांतील अनेक शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त
ओडिशा मधील मलकानगिरीमध्ये पेट्रोलचे दर 4.69 रुपये, तर डिझेलचे दर 4.45 रुपयांनी कमी होणार आहेत. त्याचबरोबर छत्तीसगड विजापूर ते सुकमा शहरांमध्ये पेट्रोल 2.09 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.02 रुपयांनी घट होणार आहे. तसेच 6 राज्यांतील अनेक शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त होऊ शकते. त्यात अरुणाचल प्रदेशामध्ये तुमला, तुटिंग, तवांग, जंग, अनिनी आणि हवाई येथे पेट्रोलचे दर अनुक्रमे 3.96 रुपये, 3.47 रुपये, 3.72 रुपये, 3.47 रुपये, 3.02 रुपये आणि 2.48 रुपये कमी होतील. तर डिझेलच्या दरात 3.12 रुपये, 3.04 रुपये, 2.89 रुपये, 2.65 रुपये, 2.63 रुपये आणि 2.15 रुपयांची घट होणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहकांसाठी तेल कंपन्यांचा निर्णय
दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेशातील काझामध्ये पेट्रोल 3.59 रुपयांनी आणि डिझेल 3.13 रुपयांनी कमी होणार आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ धाममध्ये पेट्रोलच्या दरात 3.83 रुपयांनी व डिझेलच्या दरात 3.27 रुपयांची घट होणार आहे. मिझोरामच्या तीन भागात पेट्रोल 2.73 रुपयांनी आणि डिझेल 2.38 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर ओडिशाच्या 9 भागात पेट्रोल 4.69 रुपयांनी आणि डिझेल 4.45 रुपयांनी कमी होणार आहे. दुर्गम ठिकाणी तेल विपणन कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेल डेपोपासून लांब असलेल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी आंतरराज्य मालवाहतुक सुलभ करण्यासाठी तेल कंपन्यांनीही हा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे अनेक शहरांमध्ये ग्राहकांना सवलतीचे दर मिळतील, ज्यामुळे वाहनधारकांना आर्थिक दृष्ट्या लाभ होणार आहे .