Petrol Diesel Price : सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस किट असलेल्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल स्वस्ताईच्या अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र काही पेट्रोल स्वस्त झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol Diesel Price) स्वस्त होंण्याचा दावा करण्यात आला आहे.
पेट्रोलचा (Petrol Diesel Price) दर असा विषय निघाला की बऱ्याचदा निवडणुकांशी त्याचा संबंध लावला जातो. मोदी सरकार येण्यापूर्वी काँग्रेसच्या काळात इंधन किमतीत वाढ झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी देश डोक्यावर घेतला होता. पण भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल (Petrol Diesel Price) डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी त्यांनी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जनतेने मोठा रोष व्यक्त केल्यानंतर गेल्या दीड वर्षात इंधनाचे भाव स्थिर आहेत. एकदाच हे भाव उच्चांकावर पोहोचल्यावर ते जणून लॉक करण्यात आले आहेत. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर दहा रुपये स्वस्ताईचा दावा करण्यात येतो आहे.
पेट्रोल कंपन्या नफ्यात
आकडेवारीचा विचार केला असता कंपन्यांना सहा महिन्यात 4917 टक्क्यांचा नफा झाला आहे. एप्रिल 2022 पासून पेट्रोल (Petrol Diesel Price) आणि डिझेलच्या किमतीत फारसा बदल झाला नाही. शिवाय मे 2022 मध्ये केंद्र सरकारने इतर कर तर राज्यांनी व्हॅट कमी केला होता. आर्थिक वर्ष 2022 – 23 ची तुलना करता कंपन्यांना मिळालेला नफा हा 4917 टक्के इतका अधिक आहे. तज्ञांच्या मते नफ्याचे हे गणित 75 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे या तिमाही तीनही कंपन्यांना एकत्रित 57,542.78 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
दहा रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा (Petrol Diesel Price)
एचटीच्या एका वृत्तानुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना यापूर्वी मोठा तोटा सहन करावा लागला होता केंद्र सरकारने त्यांना काही हजार कोटींचे अनुदान दिले होते. त्यानंतर या कंपन्या फायद्यात आलया आहेत. त्यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यात तिमाहित नफा कमवला आहे. जागतिक बाजारात पण कच्च्या तेलाच्या (Petrol Diesel Price) किमती घसरल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र या गावानुसार खरोखरच पेट्रोलची किंमत कमी होऊन दिलासा मिळेल की पुन्हा एक ही अफवाच असेल हे लवकरच समोर येईल.