Petrol-Diesel Price : राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये आणखी कपात केली जाणार ???

Petrol-Diesel Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Petrol-Diesel Price : जगभरात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा सर्वसामान्यांवर होतो आहे. या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासा मिळताना पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात नुकतीच कपात केली गेली आहे. यानंतर अनेक राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात केली आहे. ज्याच्या परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10-15 रुपयांनी घसरण झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया रिसर्चने सोमवारी जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या गेल्या तेव्हा राज्यांना मूल्यवर्धित कर (VAT) स्वरूपात 49,229 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला. यामुळेच आता राज्यांना व्हॅटमध्ये कपात करण्यास जास्त वाव आहे. SBI रिसर्चने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, VAT अजूनही महसुलापेक्षा 34,208 कोटी रुपये जास्त आहे. राज्य सरकारांना हवे असल्यास ते तेलाच्या किंमती कमी करू शकतात. Petrol-Diesel Price

Petrol-Diesel Price: कच्चे तेल की कीमतों में उछाल के बीच पेट्रोल-डीजल के  दाम अपडेट, फटाफट जानें आज का रेट - petrol diesel prices update today 29 may  2022 iocl fuel rate no

SBI चे चीफ फायनान्शिअल ऍडव्हायझर असलेले सौम्या कांती घोष यांनी रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, कोविड-19 नंतर राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ज्यामुळे त्यांच्याकडे कर जमा करण्यासाठी आणखी माध्यमे खुली झाली आहेत. ते पुढे म्हणाले की,” या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उत्पादन शुल्कातील कपात केली तर तेलाच्या महसुलावर राज्यांना फायदा किंवा तोटा होणार नाही. तसेच, तेलावरील व्हॅट कमी न करताही राज्य सरकारांना डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त करता येईल.Petrol-Diesel Price

Petrol and diesel prices today in Hyderabad, Delhi, Chennai, Mumbai - 20  July 2021

यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. घोष म्हणाले की,” महाराष्ट्रासारखी मोठी राज्ये, ज्यांच्यावर कर्जाचे ओझे कमी आहे, ते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी कपात करू शकतात. हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये टॅक्स -जीडीपीचे रेशयो 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या राज्यांकडे इंधनावरील टॅक्स घेण्यासाठी पुरेशी कारणे आहेत.

हे लक्षात घ्या कि, सर्व राज्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर व्हॅट आकारला जातो. त्यामुळे किंमती जितक्या जास्त असतील तितका जास्त व्हॅट मिळेल. मात्र केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले की ते आपोआपच कमी होते.Petrol-Diesel Price

Petrol News: Under-recovery in petrol at Rs 13, diesel Rs 24; Reliance-BP  says operations unsustainable - The Economic Times

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://iocl.com/petrol-diesel-price

हे पण वाचा :

Personal Finance : आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन भाव तपासा

IPL 2022 : ‘हे’ पाच खेळाडू आहेत IPL-2022 चे सर्वात मोठे फिनिशर !!!

Tax Saving :’या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मजबूत रिटर्नसह मिळवा टॅक्स सूट !!!

Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!