तब्बल 4 महिन्यांनी पेट्रोल- डिझेल महागलं; पहा आजपासूनचे नवे दर

Petrol Diesel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. गेल्या 4 महिन्यापासून पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर होते. पण आता जागतिक परिस्थिती मुळे या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेल ची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.

रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. त्यामुळे कच्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डीझेल दरवाढीवर झाला आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे