Petrol Diesel Rate | पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता; समोर आले मोठे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Petrol Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. परंतु आता खाजगी वाहन असणाऱ्या लोकांसाठी पुढील महिन्यात एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Rate) किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्याची झळ सर्वसामान्य लोकांना जास्त बसत आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. देश जगातील सर्वात मोठ्या कच्चा तेल उत्पादक देशांपैकी सौदी अरेबिया हा एक देश आहे. सौदी अरेबियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सौदी अरेबियाने जर हा निर्णय घेतला, तर भारतासाठी ही एक मोठी दिलासा बातमी असणार आहे. कारण देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल डिझेल आणि इतर किमती देखील कमी करू शकतात.

हाती आलेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याबाबत सौदी अरेबिया गांभीर्याने विचार करत आहे. अरब लाईट क्रूडची अधिकृत विक्री किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेल्स नगरसरण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतची माहिती अनेक स्त्रोतांकडून आलेली आहे.

सध्या चीनमध्ये क्रूड ऑइलची मागणी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामुळे देखील क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घट होत आहे. चीनमधील रिफायनिंग मार्जिन कमकुवत झालेले आहे. त्यामुळे आता उत्पादनाने रिअल इस्टेटच्या क्षेत्रात देखील मंदी चालू आहे. आणि याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीवर होत आहे. चीनमध्ये तर यापेक्षाही जास्त वाईट परिस्थिती आहे. सप्टेंबरमध्ये तेलाची मागणी जास्त असते. परंतु या वर्षी सप्टेंबरमध्ये या तेलाची मागणी अत्यंत कमी असलेली पाहायला मिळत आहे.

ओपेक देश उत्पादन वाढवण्याच्या तयारी | Petrol Diesel Rate

ओपेक + चा पुरवठा देखील ऑक्टोबर पासून वाढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओपेक या गटातील आठ सदस्य पुढील महिन्यात दररोज 180, 000 एवढे बॅरेल बॅरेल उत्पन्न वाढवण्याची तयारी करत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई बेंच मार्क मजबूत झालेले आहे. त्यामुळे ऑक्टोबर साठी अरब लाईटचा ओएसपी थोडा बदलेला अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आलेली आहे.