येत्या 5 वर्षात पेट्रोलवर बंदी घालणार, नितीन गडकरी यांचे मोठे विधान

Nitin Gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात इंधनाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दोन रुपयांनी जरी कमी झाले तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात येईल, असे त्यांनी (Nitin Gadkari) म्हटले आहे. त्यावर बंदी घालण्यात येईल. अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते 70 रुपये प्रति किलो दराने विकता येते. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. तसेच केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज आहे तेदेखील ते म्हणाले.

इथेनॉलमुळे 20,000 कोटी रुपयांची बचत होते
इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना असून त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठ बरेच काही करू शकते असेदेखील (Nitin Gadkari) नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?