हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथील एका शेतकऱ्याने मांजर समजून चक्क बिबट्याचे पिल्लू पाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने मांजर समजून हे पिलू घरी आणलं. पण मांजराची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी डॉक्टर कडे दाखवलं असता हे मांजर नसून बिबट्या आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. यांनतर पुण्यातील रेस्क्यू संस्थेकडे या बिबट्याच्या पिल्लाला सोपवण्यात आलं.
नेमकं काय घडलं –
नाशिक येथील शेतकऱ्याने मांजर समजून बिबट्या पाळला. मांजर समजून मालकाने रोज दूध-ब्रेड, पोळी खायला दिले. त्यानंतर तब्ब्येत बिघडल्याने मालकाने त्या मांजराला डॉक्टरकडे नेले. त्यावेळी हे मांजर नसून बिबट्याचे पिल्लू आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांनतर नाशिक येथील इको एको संस्थेत या पिल्लावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नाशिक वन विभाग आणि इको एको संस्थेने हे बिबट्याचे पिल्लू पुण्यातील रेस्क्यू संस्थेकडे सोपवले. चुटकी असं या मादी बिबट्याचं नाव ठेवण्यात आलं आहे.
चुटकी रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात आल्यावर तिला लगेच हॅास्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथून चुटकीवर उपचार सुरू झाले. हिमोग्लोबिन कमी झाल्याने या पिल्लाला रक्ताची गरज होती. मात्र त्याच वेळी मातेपासून वेगळं झालेलं एक पिल्लू संस्थेत दाखल झालं होतं. दोघांचाही रक्तगट समान असल्याचे लक्षात येताच संस्थेने वनविभागाची परवानगी घेऊन दुसऱ्या पिल्लाचं रक्त आजारी पिल्लाला दिलं, आता दोन्ही पिल्ले एकदम चुणचुणीत आहेत