नवी दिल्ली । PF खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर EPFO मधून तुम्हाला एक लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो आणि तुम्हाला या पैशासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स देण्याचीही गरज नाही. EPFO च्या वतीने पगारदार लोकांना ऍडव्हान्स क्लेम अंतर्गत हे पैसे काढण्याची सुविधा दिली जात आहे.
EPFO ने म्हटले आहे की, “जीवघेणा आजार झाल्यास, अनेक वेळा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकेल. अशा गंभीर स्थितीतील रुग्णांचा खर्च भागविण्यासाठी ऍडव्हान्सची सुविधा देण्यात येत आहे.”
यासाठीची अट काय आहे जाणून घ्या
क्लेम करणार्या कर्मचार्याच्या रुग्णाला सरकारी/पब्लिक सेक्टर यूनिट/CGHS पॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असल्यास त्याबाबतही चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही मेडिकल क्लेमसाठी अर्ज भरू शकता.
तुम्हाला किती फायदा होईल
तुम्ही 1 लाख रुपये ऍडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे थेट कर्मचार्यांच्या खात्यात किंवा हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
स्लिप 45 दिवसांत द्यावी लागेल
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल ऍडव्हान्स रकमेसह एडजस्ट केले जाते.
पैसे कसे काढायचे ?
>> तुम्ही http://www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऍडव्हान्स क्लेम ऑनलाइन दाखल करू शकता.
>> याशिवाय http://unifiedportalmem.epfindia.gov.in वरूनही ऍडव्हान्स क्लेम दाखल करता येईल.
>> येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.
>> आता तुम्हाला क्लेम (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक एंटर करून व्हेरिफाय करावे लागेल.
>> आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.
>> ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स (फॉर्म 31) निवडावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.
>> आता तुम्हाला रक्कम एंटर करावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
>> यानंतर तुमचा एड्रेसची डिटेल्स भरा.
>> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP एंटर करा.
>> आता तुमचा क्लेम दाखल केला जाईल.