धुळ्यात खून करणारा फलटणमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप
धुळे जिल्ह्यातून खून करून फरार असलेल्या आरोपीस ग्रामसुरक्षा दल व पोलिस पाटील यांचे मदतीने फलटण तालुक्यातील निंबळक येथून ताब्यात घेण्यात आले. सदरच्या फरार संशयित आरोपीस धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी रोहिदास दादासो जाधव (रा. निंबळक, ता. फलटण, जि. सातारा) याने दि. 12 रोजी रमणपुरा शिवार (ता. जि धुळे) येथे आदर्श प्रल्हाद पिसाळ (रा. शिंदेवाडी, ता. धुळे, जि. धुळे) याचा खून करून फरार झाला होता. सदर आरोपीबाबत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणे संपर्क साधून सदर घटनेबाबत कळविले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिस सदर आरोपीच्या मार्गावर होते. सदरचा आरोपी हा निंबळक येथे येणार असले बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ गावातील ग्राम सुरक्षा दल व पोलिस पाटील प्रमोद ज्ञानदेव बनकर यांना सदर आरोपी ताब्यात घेण्याकरिता सांगितले. ग्रामीण पोलिस पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याशी संपर्क करून ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सातारा समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व पोलिस उपअधीक्षक सातारा बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलिस ठाणे धन्यकुमार गोडसे सहा. पो. नि. नितीन शिंदे, पो. उपनि सागर अरगडे, पोहवा अमोल कर्णे, पोहवा अडसूळ, पो ना अभिजीत काशीद, पोना अमोल जगदाळे, पोना योगेश रणपिसे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.