Pik Vima Yojana | राज्यातील शेतकऱ्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिकविम्यासाठी 31 जुलै पर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. परंतु आता यामध्ये ३ दिवसांची वाढ करण्यात आली असून आता येत्या ३ ऑगस्टपर्यंत शेतकरी पिकविम्यासाठी अर्ज भरू शकणार आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास (Pik Vima Yojana) उत्तम प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तसेच, तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये. यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 31, 2023
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही शेती संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून सर्व सरकारी योजनांना घरबसल्या अर्ज करता येतोय आणि थेट आर्थिक लाभ उचलता येतोय. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. यामुळे सरकारी कार्यालयात तुम्हाला हेलफाटे घालावे लागत नाहीत आणि तुमचा वेळही वाचतोय. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशु- खरेदी विक्री, रोजचा हवामान अंदाज, बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.
पीक विम्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण- Pik Vima Yojana
गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी सतत तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातबाराचे संकेतस्थळ बंद असणे, आधार आधार क्रमांक व्हेरिफाय होण्यास वेळ लागणे अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आजवर लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या गोष्टीचा विचार करूनच सरकारकडून पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यातच भर म्हणजे राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान काही शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा फॉर्म (Pik Vima Yojana) देखील भरता आलेला नाही. तर काही शेतकऱ्यांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना हा अर्ज भरता आला नाही. मात्र आता मुदतवाढ केल्यामुळे शेतकरी तीन ऑगस्टपर्यंत हा अर्ज भरून योजनेचा लाभ घेऊ शकतात.