पिंप्री चिंचवड । महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘आयर्न मॅन किताब’ पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये करण्यात आला.
आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, पॅरामिलटरीमधील “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये नोंद होणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कृष्ण प्रकाश हे 1997 बॅचचे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आहेत. कृष्ण प्रकाश यांची एक डॅशिंग, कणखर पोलीस अधिकाराची म्हणून त्यांची ओळख आहे. जागतिक दर्जा असलेल्या शारीरिक स्पर्धेत “आयर्न मॅन किताब” पटकविल्यानंतर “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये त्यांची नोंद झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची मन उंचावली आहे. हा बहुमान मिळाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’