नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत. यासाठी इथे दुहेरी उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यामुळेच वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाबाबत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी मीटिंग घेऊन येथील महामार्गाची वस्तुस्थिति सांगितली होती. या सहा पदरी नवीन महामार्गासाठी कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सोबत झाली.

या बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी काही सूचना केल्या कि, नवीन महामार्गाच्या सहापदरीचे काम अधिकाऱ्यांनी पूर्व नियोजन करून जलद गतीने पूर्ण करावेत तसेच वाहतूक नियोजनाचा सुद्धा विचार केला जावा अश्या काही सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले, खा.धैर्यशील माने, संजय मंडलिक, आ. मानसिंगराव नाईक, राजू आवळे, अरुण लाड, चंद्रकांत जाधव, सुरेश खाडे आदीसह साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, एनएचएआय चे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमली श्रीवास्तव,महाप्रबंधक मधुकर वाठोरे,प्रकल्प संचालक वसंत पंधरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या महत्वपूर्ण अश्या बैठकीत सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण वर चर्चा होऊन या भागातील सर्व लोकप्रतिनिधीच्या कडून सूचना घेण्यात आल्या. या सर्व सूचनांचा विचार करून महामार्गाचा आराखडा बनविला जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. कराड शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जातो या महामार्गावरील कोल्हापूर नाका येथे शहराच्या प्रवेशावर आजपर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडी नित्याचीच असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील काही वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सोबत मिटिंग सहित महामार्गाच्या व संबंधित विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका वारंवार घेतल्या होत्या. काल सुद्धा कोल्हापूर येथील बैठकीत आ. चव्हाण यांनी कराडच्या उड्डाणं पुलाबाबत व येथून जाणाऱ्या महामार्गाबाबत अधिकाऱ्याकडून माहिती समजून घेऊन त्यांना आवश्यक अश्या सूचना केल्या ज्या या महामार्ग उभारणीसाठी उपयुक्त असतील.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड शहराचा प्रवेश हा राष्ट्रीय महामार्गावर आहे यामुळे इथे उड्डाणंपूल होणे गरजेचेच असल्याने या संबंधी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या याला आज काही प्रमाणात मूर्त स्वरूप येत आहे. नुकताच नितीन गडकरी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची आज तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या सोबत झालेली बैठक ही महत्वपूर्ण आहे. कराड मध्ये कोयना नदीवरील पूल हा 10 लेन चा होणार असून शहरावरून जाणारा उड्डाणपूल हा पंकज हॉटेल च्या समोरून जाईल ते मलकापूर येथील डी मार्ट पर्यंत असणार आहे. हा जवळपास 2.5 किमी चा पूल असून तो 6 लेन चा असूणार आहे आणि या संपूर्ण पुलाची रचना सिंगल पिलर सिस्टीम ची असणार आहे. या पुलाखालील सेवा रस्ता हा 4 लेन चा होईल व त्याच्या बाजूला गटर व फुटपाथ रेलिंग सह होणार आहे. हा कराड शहरासाठी अत्यंत उपयुक्त असा पूल असून वाहतूक सेवा सुरळीत राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती कोल्हापूर येथील बैठकीत मिळाली.

नांदलापूर फाटा येथे पावसाचे पाणी ओढ्यामार्गे येऊन पाणी रस्त्यावर येत असते या ठिकाणी नाले हे भुयारी मार्गाचे करून ओढ्याचा मूळ प्रवाह मार्गी लावला तरच येथील पूरप्रश्न मार्गी लागेल यासाठी लवकरच संबंधित विभाग व एनएचएआय च्या अधिकाऱ्यांची फिल्ड व्हिझीट घेऊन आढावा घेतला जाईल असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.