अमेरिकेत खराब हवामानामुळे विमान कोसळले, 5 प्रवासी आणि वैमानिक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अलास्का । अमेरिकेच्या अलास्का येथे खराब हवामानामुळे विमान अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 प्रवासी आणि 1 वैमानिकाचा समावेश आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दक्षिण अलास्कामध्ये एक साइटसीइंग प्लेन MH-60 जेहॉक पर्यटकांना घेऊन साइटसीइंगसाठी जात होते. त्यानंतर अचानक हवामान बिघडू लागले आणि विमान कोसळले.

तटरक्षक दल आणि फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशनला सांगण्यात आले की,”विमानाची इमर्जन्सी स्टेटस लाईट रात्री 11.20 च्या सुमारास सक्रिय झाली. त्यानंतर केचिकनजवळ मिस्टी जोडर्स राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात विमान कोसळले. तटरक्षक दलाला विमानाचे भग्नावशेष सापडल्यानंतर, दोन बचावकर्ते हेलिकॉप्टरद्वारे अपघातस्थळी रवाना झाले, ज्यांनी सांगितले की,”या अपघातात कोणीही बचावले नाही.”

तटरक्षक दलाने सांगितले की,” या अपघाताच्या वेळी घटनास्थळी धुके होते आणि हलका पाऊसही पडत होता. या दरम्यान वारा थोडा जोरदार होता आणि व्हिजिबिलिटी फक्त 2 मैल होती. विमान बेपत्ता झाल्यानंतर अलास्का स्टेट ट्रूपर्स आणि तटरक्षक दलाने मिळून शोधमोहीम सुरू केली.

विमान अपघातात ठार झालेल्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आता फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची पुढील चौकशी करतील. याआधी 2019 मध्ये, दोन पर्यटक विमाने हवेत धडकली होती त्यावेळी या दोन विमानांमधील 16 पैकी सहा जण ठार झाले होते.

Leave a Comment