Thursday, March 30, 2023

रेल्वे प्रवासाच्या मुभाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाबाबत दोन तर तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्यावतीने आज मुंबईत रेलभरो आंदोलनही करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, रेल्वे प्रवासाबाबत दोन ते तीन आठवडे झाली चर्चा होत आहे. यासह सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या दोन डोस लसींचे घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्याबाबत तसेच अनेक गोष्टीबाबत राज्य सरकारबरोबर चर्चा करणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.