टांझानियात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; Video आला समोर

plane crashed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची (plane crashed) धक्कादायक घटना घडली आहे. या विमानात एकूण 43 प्रवासी प्रवास करत होते. खराब हवामानामुळे हे विमान टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात (plane crashed) कोसळले. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि बचाव दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले.

टांझानियाचे विभागीय आयुक्त अल्बर्ट चालमिला यांनी दिलेल्या माहितीनुसार, टांझानियाची राजधानी दार एस सलाम येथून हे विमान कागेरा येथे जात होतं. यावेळी या विमानात 39 प्रवासी, 2 पायलट आणि 2 केबिन क्रू असे एकूण 43 लोक होते. खराब हवामानामुळे हे विमान बुकोबा विमानतळावर उतरत होते मात्र विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे विमान कोसळले (plane crashed).

आतापर्यंत एकूण 26 प्रवाशांना अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढण्यात (plane crashed) आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून वैमानिकाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती नंतर जाहीर करण्यात येईल. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी