हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये काही शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले होते. तर काही शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र आता 1 सप्टेंबर पासून व्यवसायिक अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
बारावीच्या निकालानंतर निर्णय
याबाबत बोलताना ते म्हणाले बारावीनंतर ‘व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलै अखेर घेऊन 15 ऑगस्ट पर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबर पासून व्यवसायिक अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. तर बीए, बीकॉम, बीएस्सी अशा विना व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही असे देखील उदय सामंत यांनी सांगितले.
‘या’ अभ्रासक्रमासाठी ऑनलाईन अर्जाची नोंदणी
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील.सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://mhtcet2021.mahacet.org या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे सामंत यांनी ट्विट करून सांगितले आहे.
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
— Uday Samant (@samant_uday) June 8, 2021
शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनयासाठी आज पर्यंत 50 लाख एक कोटींचा निधी देण्याची घोषणा अनेकांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी तीन कोटी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा अध्यादेशही काढण्यात आलाय शिवाय ग. गो. जाधव अध्यासन केंद्रासाठी ही 50 लाखांचा निधी आठ-दहा दिवसात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
सीमा भागात मराठी भाषिकांसाठी नवे शिक्षण संकुल
कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषेत जनता आपली साहेब त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नातून कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. लवकरच स्वतःच्या जागेत हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होईल. असेही शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे सीमाभागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.