आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १० हजारांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | अकोल्यातील मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ९ आक्टोबर रोजी शरद पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता.

जमलेल्या लोकांसाठी करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला होता. सभा संपल्यानंतर प्रांगणात प्लास्टिक ग्लासचा मोठा खच साचला होता. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली
आहे.