द्राक्षांच्या संरक्षणासाठी बसवा प्लास्टिक कव्हर; सरकारी योजनेतंर्गत घ्या लाभ

Plastic Cover Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे द्राक्ष उत्पादकाला मोठे नुकसान सहन करावे लागते. याच नुकसानीपासून द्राक्षांच्या पिकाला वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. सरकारने द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक कव्हर योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकरी गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्षाचा बचाव करु शकणार आहेत. या योजनेचा लाभ फक्त द्राक्ष उत्पादकच घेऊ शकणार आहेत. यामध्ये कंपन्या, शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्था, वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या यांचा समावेश असणार आहे. मुख्य म्हणजे, योजनेतंर्गत मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर फक्त द्राक्षबागांसाठीच अनिवार्य असणार आहे.

असा करा अर्ज –

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये आपसातील भाडेपट्टा करार ग्राह्य धरण्यात येणार नाही.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही घरबसल्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी थेट अर्ज करून आर्थिक लाभ मिळवू शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त जमीन मोजणी, हवामान अंदाज, सातबारा उतारा, कृषी सल्ले, रोजचा बाजारभाव यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकटमध्ये मिळत आहे. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

दरम्यान शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाचविण्यासाठी तसेच द्राक्षांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने ही योजना आमलात आणली आहे. तसेच या योजनेमुळे उच्च दर्जाचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हि नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. नुकतीच राज्य सरकारकडून एक रुपयात पीक विमा योजना देखील जाहीर झाली आहे. याचा लाभ देखील शेतकरी घेताना दिसत आहेत.